मावळे दुर्गवेडे ग्रुपचा प्रेरणादायी उपक्रम; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा जाहीर सत्कार, कार्यकर्तृत्वाला सलाम

तांदळी (प्रतिनिधी): राम कांबळे 

तांदळी येथील माळवाडी परिसरात मावळे दुर्गवेडे ग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून प्रतिष्ठित पदांवर निवड झालेल्या मान्यवरांचा जाहीर सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याबरोबरच तरुण पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी शिरूर तालुका वकील संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले ॲड. गणेश कळसकर, कै. रघुनाथ वामन कळसकर सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झालेले संजय कळसकर, पीडीसी बँकेत कॅशियर म्हणून कार्यरत अरुण देशमुख, भारतीय सैन्यात कार्यरत मेजर मनोहर शिंदे तसेच खासगी कंपनीमध्ये कार्यरत बंडू रायकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले.

कार्यक्रमात महेंद्र गदादे, प्रा. संतोष शेलार, सुनील गदादे, सुनील कळसकर, ॲड. गणेश कळसकर, सोसायटीचे चेअरमन संजय कळसकर, प्रगतशील शेतकरी सतीश गदादे, वृक्षमित्र वामन कळसकर आणि अरुण देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संदेश देत सत्कारमूर्तींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक विचारांना चालना मिळते आणि युवकांना विविध क्षेत्रांत प्रगती करण्याची प्रेरणा मिळते, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास श्रीदत्त सोसायटीचे संचालक फत्ते


सिंग गदादे, माजी उपसरपंच आश्रत गदादे, संतोष भाऊसाहेब कळसकर, खंडू गदादे, विशाल गाडे, नवनाथ गदादे, शंकर कळसकर, मनोहर गदादे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी विविध क्षेत्रांत यश मिळविलेल्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. मावळे दुर्गवेडे ग्रुपचा हा सन्मान सोहळा सामाजिक ऐक्य, प्रेरणा आणि गुणवंतांचा गौरव करणारा उपक्रम ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *