समाजहितासाठी कार्य करणाऱ्या डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांचा अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशनतर्फे सन्मान

सासवड (पुरंदर) :शाम जगताप 

समाजहित, सामाजिक एकात्मता आणि लोककल्याणासाठी सातत्याने कार्य करणारे पुरोगामी संघर्ष परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. सुभाषजी वायदंडे यांचा अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सासवड (ता. पुरंदर) येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

या सन्मान सोहळ्याला ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मा. आप्पासाहेब भांडवलकर, प्रदेशाध्यक्ष मा. राहुल काका भोंडे तसेच प्रसिद्धीप्रमुख श्याम जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते डॉ. वायदंडे यांचा सत्कार करत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व जनकल्याणकारी कार्याचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. वायदंडे यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणत सामाजिक सलोखा, जनजागृती आणि लोकहिताच्या उपक्रमांद्वारे केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. त्यांच्या कार्यामुळे समाजातील अनेकांना प्रेरणा मिळत असून, भविष्यातही त्यांच्या नेतृत्वातून समाजोपयोगी उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास युवक प्रदेशाध्यक्ष मनोज दादा भिसे, पश्चिम महाराष्ट्र सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ अडागळे, महाराष्ट्र राज्य वरिष्ठ संपर्कप्रमुख भानुदास भिसे, पुणे जिल्हा वरिष्ठ जिल्हाध्यक्ष गोकुळ तात्या भिसे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख संदीप भोंडे, अजित पाटोळे, पुणे जिल्हा युवती जिल्हाध्यक्ष श्वेता आडगळे, किशोर आडगळे, राजू आडगळे, ज्ञानेश्वर आडगळे, सचिन भोंडे, गणेश भोंडे, पिनू शेठ पाटील, सृष्टी बडदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी डॉ. प्रा. सुभाषजी वायदंडे यांना पुढील सामाजिक, शैक्षणिक आणि लोककल्याणकारी वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला अधिकाधिक यश लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *