पाबळ फाटा व एस.टी. स्टँड परिसरात नाकाबंदी; नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई

 

Rjnews27 मराठी – विजय कांबळे 

शिरूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आज (दि. 20 जून 2026) सकाळी 11.00 ते 11.30 या वेळेत पाबळ फाटा चौक तसेच एस.टी. स्टँड चौक येथे पोलिसांनी नाकाबंदी करून विशेष तपासणी मोहीम राबवली.

आठवडे बाजाराच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासोबतच नियमांचे पालन करण्यावर भर दिला.

नाकाबंदी दरम्यान ब्लॅक फिल्म लावलेली वाहने, नंबर प्लेट नसलेली वाहने, तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या चालकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

दरम्यान, वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या पार्किंग व वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शिरूर नगरपालिका व पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय साधून पुढील उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 (आर जे न्यूज 27 मराठी – सत्याच्या मार्गात सर्वात पुढे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *