वाळकी येथील नवभारत विद्यालयाचा 92.59 टक्के निकाल
अल्लाउद्दीन अलवी पुणे जिल्हा प्रतिनिधी ता. दौंड तालुक्यातील नवभारत विद्यालय वाळकी या विद्यालयाचा निकाल 92.59% लागला असून विद्यालयाची गुणवत्ता, सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, सुलभ शौचालय,क्रिडांगण,तसेच विद्यालयाचा शिक्षक स्टाफ यांचे चोख नियोजन आणि गुणवत्तेमुळे विद्यालयाचा निकाल लागला आहे .यामध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सादिक भाई शेख यांची चिरंजीव कु. जैद सादिक शेख 86. 45%, दुसरा क्रमांक वैष्णवी गणेश टुले 83. 45 %तृतीय क्रमांक तनिष्का रवींद्र थोरात 80.80%, चतुर्थ क्रमांक दिशा दिलीप गजरे बा 77.20 आणि पाचवा क्रमांक रिया समीर थोरात 76.20%असा निकाल लागून घवघवीत यश नवभारत विद्यालयाला मिळाले आहे आणि सातत्याने या निकालाची परंपरा टिकवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले नवभारत विद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत भालेराव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी टुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे व्यवस्थापन करत असून पुढील शैक्षणिक वर्षामध्ये सर्व पालकांनी आपली मुले नवभारत विद्यालयामध्ये ऍडमिशन घेऊन जास्तीत जास्त पट मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आव्हान यावेळी केले. या घवघवीत निकालामुळे पंचक्रोशीत विद्यालय शिक्षक, विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप पडत आहे.




