नागरगाव (प्रतिनिधी – विजय कांबळे)
शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशाला, तळेगाव ढमढेरे येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक समता, शिक्षण प्रसार आणि स्त्री शिक्षणाच्या कार्यातून समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या महात्मा फुले यांच्या विचारांचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे प्राचार्य अशोक दहिफळे यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर प्राचार्य अशोक दहिफळे यांनी आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा फुले यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजात समता आणि बंधुता रुजविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदा सातपुते यांनी केले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अविनाश कुंभार यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी चंद्रशेखर सातपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उप
उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंद ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे तसेच जेष्ठ संचालक विजय ढमढेरे यांनी प्रशालेस शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांवर चालत समाज घडविण्याचे आवाहन केले.





