हडपसरच्या साहिल कळमकरची पुणे शहर पोलीस दलात निवड; इलाईट ड्रीम सोसायटीतर्फे उत्स्फूर्त सत्कार

हडपसरच्या साहिल कळमकरची पुणे शहर पोलीस दलात निवड; इलाईट ड्रीम सोसायटीतर्फे उत्स्फूर्त सत्कार
हडपसर (प्रतिनिधी) – तरुणाईने जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर मोठे ध्येय गाठता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण ठरलेल्या साहिल उल्हास कळमकर याची पुणे शहर महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल हडपसर येथील इलाईट ड्रीम सोसायटीतर्फे नुकताच भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी सोसायटीच्या पदाधिकारी आणि रहिवाशांच्या उपस्थितीत साहिल कळमकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कळमकर यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी आनंद व्यक्त करत त्यांचे मनापासून अभिनंदन केले तसेच पुढील सेवाभावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना साहिल कळमकर यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक आणि मार्गदर्शक यांना दिले. “कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हे यश मिळाले. समाजासाठी प्रामाणिकपणे सेवा करणे हेच पुढील ध्येय आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास सोसायटीचे सचिव विशाल साळुंके यांच्यासह इलाईट ड्रीम सोसायटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुणांच्या यशाचा अभिमान बाळगत सोसायटीने आयोजित केलेला हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
— विकास साळुंके, दौंड तालुका प्रतिनिधी
Rjnews27 मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *