पिंपळसूटीच्या यात्रेचा आखाडा अखेर झाला चुरशीचा ,तर शिरूर महिला केसरी ऋतिका पवार यांच्या उपस्थितीने विशेष आकर्षण

पिंपळसूटीच्या यात्रेचा आखाडा अखेर झाला चुरशीचा ,तर शिरूर महिला केसरी ऋतिका पवार यांच्या उपस्थितीने विशेष आकर्षण

अल्लाउद्दीन अलवी  प्रतिनिधी

३ शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील ग्रामदैवत शंभू महादेव उत्सवानिमित्त सोमवार दिनांक ३०/०३/२०२६ रोजी यात्रा उत्सव निमित्ताने पहाटे ५ वाजल्यापासून शंभू महादेवांना अभिषेक महापूजा करण्यात आली, तसेच दुपारी १२ ते ७.०० वाजेपर्यंत शेरण्याचा कार्यक्रम अगदी भक्ती भावानी पार पाडला.तसेच संध्याकाळी ९
वाजता छबिना फटाक्यांच्या आतिषबाजीने विशेष आकर्षण पाहायला मिळाले.त्यानंतर संध्याकाळी मालती इनामदार लोकनाट्य तमाशा सर्व ग्रामस्थ- पाहुण्यांच्या करमणुकीसाठी ठेवण्यात आला . त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक ३१/०३/२०२६ रोजी सायंकाळी चार वाजता जंगी कुस्त्यांचा आखाडा राज्यातून आलेल्या अनेक भागातून मल्ल, तसेच शिरूर महिला केसरी ऋतिका पवार पैलवान यांनी उपस्थित राहून विशेष आकर्षण वाढवले. यावेळी त्यांचा ग्रामस्थ व यात्रा कमिटी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व अकरा हजार रुपये रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला .या आखाड्यातील अभिजीत फराटे आणि यशराज बारगुजे यांची अंतिम कुस्ती अत्यंत चुरशीची ठरत बरोबरीत सुटली.या आखाड्याचे सूत्रसंचालन आसाराम फराटे ,भाऊसाहेब पंडित यांनी केले यावेळी मांडवगण फराटा पोलीस औट पोस्ट चे पोलीस उपनिरीक्षक भागवत साहेब, कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तर प्रमुख उपस्थितीमध्ये इनामगाव,मांडवगण फराटा, बाभुळसर बुद्रुक,तांदळी,निर्वी, शिरसगाव, वडगाव रासाई चे सरपंच व पदाधिकारी यांचा गावचे वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी यात्रा कमिटी म्हणून खास नियोजन सुनील तात्या फलके, भाऊसाहेब खळदकर,नाना फलके,बाळासाहेब लगड ,आसाराम फराटे,पोपट फराटे,सतीश वाबळे, सुरेश मोहिते, विष्णू वाबळे,शशिकांत वेताळ ,दसरथ पारखे, ऋषिकांत फराटे, नितीन फलके,भाऊसाहेब फलके, अशोक फराटे,सुरेश कापरे,रामभाऊ काळे यांनी पंच म्हणून काम केले. तसेच संध्याकाळी करमणुकीसाठी शिवानी – अश्विनी बोरगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पंचक्रोशीचे सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवली .या निमित्ताने सर्वांचे आभार पिंपळसुटी गावच्या आदर्श सरपंच निर्मलाताई फलके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *