द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने केशव लवांडे हे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
विजय कांबळे – प्रतिनीधी

नागरगावं – द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पंढरपूर या ठिकाणी ३१ मार्च २०२६ वार मंगळवार सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे आलेगाव पागा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील केशव दत्तात्रय लवांडे यांच्यासह अनेक मान्यवरांना हा पुरस्कार दिला आहे केशव दत्तात्रय लवांडे यांनी २०२२ मध्ये निर्मल सीडस बियाण्याची कंपनीमध्ये मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये नोकरी केली यांना व्यवसायिक आवड असल्यामुळे २००८ मध्ये आलेगाव पागा तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी कौस्तुभ कृषी सेवा केंद्र या नावाने व्यवसाय सुरू केला शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ऊस कांदा भाजीपाला फळे या पिकांचे मार्गदर्शन केले शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक मेळावे मार्गदर्शन शिबिरे घेतली पंधरा वर्षे या व्यवसायाचा अनुभव असल्यामुळे यापुढे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे केशव लवांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले केशव दत्तात्रयलवांडे यांना हा पुरस्कार दिल्याने आलेगाव पागा आरणगाव सह सर्व गावातील परिसरातील शेतकरी व नागरीकांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच सर्वांनी अभिनंदन केले,महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६ हा पुरस्कार संत शिरोमणी सावता महाराज यांची १९ वे वंशज ह भ प सावता महाराज वसेकर अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर, यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ डॉ प्रणिती भालके नगराध्यक्ष पंढरपूर शहर, दीपप्रज्वलन दशरथ वाघमोडे पोलीस निरीक्षक पंढरपूर पोलीस ठाणे यांच्या हस्ते तर, प्रमुख उपस्थिती अँड माधवी निगडे पंढरपूर देवस्थान विश्वस्त, अन्सार शेख संस्थापक अध्यक्ष द युवा ग्रामीण पत्रकार संघ, प्रमुख पाहुणे सौ अनिता शिंदे वनरक्षक अधिकारी, अशोक ढाकणे उद्योजक प्रथमेश मसाले,अँड प्रणव परिचारक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, सौ कल्पना पवार राष्ट्रीय महिला अध्यक्षा द युवा ग्रामीण पत्रकार संघ, ह भ प नामदेव महाराज साठे अध्यक्ष श्री संतराज देवस्थान ट्रस्ट, अल्ताफ शेख निर्माता निर्देशक, शकील मणियार अध्यक्ष द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, सौ रुपाली सावंत महिला राज्य अध्यक्षा , बाळासाहेब कौठुळे राज्य सचिव , सौ मंगल सासवडे महिला राज्य सचिव , संतोष लांडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष , दिनेश शिंदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष, सौ धनश्री कदम सोलापूर महिला जिल्हा अध्यक्षा , प्रतीक नलावडे जिल्हा उपाध्यक्ष आलेगाव पागाची माजी पोलीस पाटील ज्ञानेश्वर भाऊ वेताळ प्रगतशील बागायतदार संजयराव बेनके या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्काराचे वितरण झाले या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते निमंत्रक द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी व सदस्य ,अशी माहिती शरदराव रासकर सरचिटणीस द युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हा यांनी दिली आहे.




