बाभुळसर बुद्रुक येथे हभप शिवणे महाराज यांची सहावी दिवशी किर्तन सेवा संपन्न
प्रतिनिधी -अल्लाउद्दीन अलवी

: शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला. वर्ष ३४ चालू असलेल्या या किर्तन सेवेत हभप शिवणे महाराज यांचे उपस्थितीने भक्तांच्या मनाला आनंद लाभला.
या सोहळ्यात बाभुळसर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी चेअरमन नवनाथ रणदिवे यांनी हभप शिवणे महाराज यांचा सत्कार केला. कार्यक्रमाला बहुसंख्य भाविक भक्त उपस्थित होते आणि त्यांनी हरिनामाची गजरात मंत्रमुग्ध अनुभव घेतला.
सोहळ्यात सकाळची पंगत शामराव पोपटराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडली, तर संध्याकाळी पंगत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र आण्णा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना हभप उत्तम मामा नागवडे यांनी सांगितले की, “सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन आपले आर्थिक योगदान द्यावे. त्यामुळे समाजातील धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम अधिक प्रभावीपणे चालू राहतील.”
हा किर्तन सोहळा भक्तीभावनेत हरिनामाच्या गजरासह संपन्न झाला आणि उपस्थित भाविकांनी संतोष व्यक्त केला.




