महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते यांचा पुरस्कार देऊन गुणगौरव
प्रतिनिधी -बालाजी कांबळे
नागरगाव – दिनांक 18 मार्च 2026 रोजी न्हावरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कार्यालयात महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा पुणे संचलित जिजाऊ लोकसंचलित साधन केंद्र शिरूर तालुका यांच्या वतीने सन 2025 26 च्या नवतेजस्विनी कार्यक्रमांतर्गत महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरुषांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आली त्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जिजाऊ लोकसंचालित साधन केंद्र शिरूर संस्थेच्या वतीने तेजस्विनी प्रकल्प अंतर्गत गावोगावी बचत गट स्थापन केलेले असून त्यामध्ये बचत गटातील महिला मदत करण्याचे काम संस्था करतेच परंतु प्रत्येक गावातील काही सामाजिक कार्यकर्तेही त्या गावात महिलांना ज्या अडचणी असतील व इतर काही बचत गटाच्या माध्यमातून प्रोग्राम राबवायचे असतील तर मदत करतात अशा पुरुषांचा सन्मान समाज सुधारक पुरुष म्हणून केला जातो यामध्ये मग शिरूर तालुक्यातील न्हावरा ,आंबळे ,करडे ,रांजणगाव, कोरेगाव ,अरणगाव ,मांडवगण फराटा ,चिंचणी, वडगाव ,निर्वी ,रामलिंग, शिक्रापूर, आंधळगाव, अशा अनेक गावातील पुरुषांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी
लता चाबुकस्वार ॲडव्होकेट , मीनाक्षीताई कोरेकर-जिजाऊ लोकसंचालित साधन केंद्र संस्था अध्यक्ष, अमिदा शेख -उपाध्यक्ष, रेखा जराड-सचिव, जयवंत भगत – कृषी अधिकारी न्हावरा, मोनिका मोहिते- संस्था व्यवस्थापक, सुजाता ताई इंगळे ,माधुरी पंडित, नागरगाव चे माजी सरपंच विद्यमान सदस्य हरिभाऊ शेलार ,हंबीर शेलार सर, आधी बचत गटांच्या महिला व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




