“मांडवगण फराट्यात ‘गावपण’चा भव्य सोहळा! पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन”

“मांडवगण फराट्यात ‘गावपण’चा भव्य सोहळा! पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन”
मांडवगण फराटा (ता. शिरूर) : प्रतिनिधी- अल्लाउद्दीन अलवी 


शिरूर तालुक्यातील अग्रगण्य बाजारपेठ असलेल्या मांडवगण फराटा येथे प्रसिद्ध व्याख्याते तसेच श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेचे प्राध्यापक संतोष शामराव परदेशी सर लिखित “गावपण” या पुस्तकाचा शानदार प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ Dr. Tatyarao Lahane यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. यामध्ये अतिरिक्त महासंचालक (यशदा, पुणे) शेखर गायकवाड, श्रीगोंदा येथील गटविकास अधिकारी राणीताई फराटे जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, वित्त विभागाचे सहाय्यक अधिकारी राजेंद्र चांदगुडे, पाठ्यपुस्तक कवी हनुमंत चांदगुडे, अभिनेते सचिन गवळी, ऊर्जा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाश शेठ कुतवळ, वाघेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव पाटील फराटे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष काका शिंदे, शिरूरचे माजी संघचालक मदनदादा फराटे, सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे, माजी संचालक भानुदास फराटे, माजी संचालक दत्तात्रय फराटे, माजी संचालक शंकरराव फराटे इनामदार, शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा चेअरमन दादासाहेब कोळपे, संचालक नरेंद्र माने, श्रीरंग हॉस्पिटलचे डॉ. धनंजय शिंदे पाटील, डॉ. प्रेमकुमार भट्टड, पंचायत समिती सदस्या संगीता किशोर फराटे, शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र गदादे, लक्ष्मण फराटे, माजी सरपंच पोपटराव निंबाळकर, ह.भ.प. सर्जेराव फराटे, भाऊमामा जगताप, पुणे जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन मचाले, महेंद्र नागवडे, रमेश परदेशी, शामराव परदेशी, मेजर सुरेश परदेशी, किसन परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मांडवगण फराटा गावातील ह.भ.प. सर्जेराव फराटे गुरुजी व ज्येष्ठ नागरिक भाऊमामा जगताप यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर फराटे यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी प्रा. संतोष परदेशी सर लिखित “गावपण” या पुस्तकाचा आशय थोडक्यात मांडत ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि गावाशी असलेले भावनिक नाते या पुस्तकातून प्रभावीपणे व्यक्त झाल्याचे सांगितले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना वाघेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव पाटील फराटे आणि दादासाहेब कोळपे यांनी प्रा. संतोष परदेशी यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगत त्यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक प्रवासाचे कौतुक केले. तसेच परिस पब्लिकेशनचे गिरीश भांडवलकर, सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. सुनील धनगर (शब्द जादूगर) आणि पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करणारे चित्रकार सारंग रामदास फराटे यांच्या कार्याचेही कौतुक करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी मोबाईलच्या अति वापरामुळे होणारे दुष्परिणाम, तसेच निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या सवयींचे महत्त्व स्पष्ट केले. आरोग्याची काळजी घेणे आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे हे आजच्या पिढीसाठी अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा परदेशी, सुनील धनगर आणि सोपान वायाळ यांनी केले. शेवटी लक्ष्मण फराटे यांनी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले. मांडवगण फराटा येथे पार पडलेला हा भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *