तांदळी येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचा नागरी सन्मान..

तांदळी येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचा नागरी सन्मान

अल्लाउद्दीन अलवी, शिरूर तालुका प्रतिनिधी
तांदळी, तालुका शिरूर, जिल्हा तांदळी येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचा नागरी सन्मान

शिरूर तालुका भाजपा पूर्व मंडळ कार्यकारिणीत नुकत्याच झालेल्या नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर तांदळी येथे नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा नागरी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

शिरूर तालुका भाजपा पूर्व मंडळ सरचिटणीसपदी उदय काका कुलकर्णी, तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी सुनील सुभाष गदादे, तर तालुका आदिवासी मोर्चा अध्यक्षपदी दादासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली. या नियुक्त्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद तसेच शिरूर तालुका भाजपा अध्यक्ष राहुल दादा पाचर्णे यांच्या हस्ते नुकत्याच बाबुराव नगर, शिरूर येथील नटराज हॉटेल सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात जाहीर झाल्या.

या नियुक्त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी तांदळी ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करून नव्या पदाधिकाऱ्यांचा शिरूर पंचायत समिती सदस्य राजू आप्पा गदादे यांच्या हस्ते नागरी सन्मान करण्यात आला.

सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भीमा काका कोरे, मधुकर गदादे, दत्ता अण्णा गदादे, मोहन गदादे, प्रकाश कळसकर, ऋषिकेश खोरे, संजय कळसकर, दिगंबर ससाणे, मंगेश गदादे, मारुती घोरपडे, प्रतीक खोरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू आप्पा गदादे म्हणाले की,
“शिरूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व हे स्वर्गीय कै. बाबुराव पाचर्णे साहेबांच्या आशीर्वादाने रुजले. माननीय आमदारांच्या आशीर्वादाने आज पक्ष तळागाळापर्यंत पोहोचला आहे. पक्षाने पदाधिकाऱ्यांवर सोपविलेली जबाबदारी म्हणजेच जनतेपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या योजना पोहोचवण्याचे काम आहे. या जबाबदाऱ्या पार पाडून कार्यकर्त्यांनी पक्ष अधिक बळकट करावा,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कळसकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रतीक खोरे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *