🔴 जयभीम नगर दापोडीत घाण पाण्याचे नरकयातना!
चार नगरसेवक असूनही कोणताही प्रतिसाद नाही, नागरिक संतप्त – ‘आम्ही गरीब म्हणून कोणीच ऐकत नाही!
दापोडी (पुणे):
पावसाळा सुरू झालाय, आणि दापोडीतील जयभीम नगर पुन्हा एकदा तुंबलेल्या घाण पाण्याच्या संकटात सापडले आहे. पायरीचे दुकान परिसरातील नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून जगत आहेत.
ड्रेनेज, संडास, आणि पावसाचे पाणी थेट घरात!
या भागातल्या ड्रेनेज लाईन पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे संडासाचे सांडपाणी, पावसाचे पाणी आणि घाण एकत्र होऊन घरात शिरते. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक सातत्याने आजारी पडत आहेत.
नागरिकांचं सांगणं:
“साहेब, पावसाळा आला की आमच्या घरात सांडपाणी शिरतं. लहान मुलं सतत आजारी पडतात. कोणालाही आमचं काही पडलेलं नाही. चार नगरसेवक असूनही एकही माणूस चौकशीसाठी येत नाही.”
प्रश्न उपस्थित करतात:
– जर निवडणुकीच्या वेळी हेच नगरसेवक घराघरात येतात, मग आता का नाही येत?
– गरीब नागरिकांना माणूस समजलं जात नाही का?
आमदार, नगरसेवक, पालिका प्रशासन झोपेत?
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कुणीही प्रतिसाद दिलेला नाही. इतकंच नाही तर प्रशासनानेही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्षच केलं आहे.
नागरिकांची मागणी:
“आमचं घर नाही, ती एक कैद झाली आहे! आम्हाला फक्त इतकंच हवंय – ड्रेनेजची व्यवस्था करा, आमच्या घरात पाणी येऊ देऊ नका!”
दापोडीतील जयभीम नगरमधील ही परिस्थिती केवळ एका भागाची समस्या नाही – तर ही संपूर्ण व्यवस्थेची बेपर्वाई, भोंगळ नियोजन आणि गरीब नागरिकांप्रती असलेली असंवेदनशीलता दर्शवते.
प्रश्न एवढाच – या घाण पाण्यात बुडणाऱ्या आवाजाला प्रशासन ऐकणार क





