कोयना प्रकल्पाची समितीकडून पाहणी; आधुनिकीकरण व सुरक्षेवर भर

कोयना प्रकल्पाची समितीकडून पाहणी; आधुनिकीकरण व सुरक्षेवर भर

 

सह्याद्रीचा आवाज | प्रतिनिधी – योगेश राऊत

महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेचा महत्त्वाचा आधार असलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पाची महाराष्ट्र विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीने पाहणी केली. आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या दौऱ्यात प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

वीज निर्मिती क्षमता, यंत्रसामग्रीचे आधुनिकीकरण, सुरक्षा व्यवस्था आणि कार्यक्षमता वाढविण्यावर समितीने भर दिला. धरण व भूमिगत वीजगृहांच्या सुरक्षेसह नियमित देखभाल आणि सार्वजनिक निधीच्या पारदर्शक वापराबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या.

 

१ हजार ९६० मेगावॅट क्षमतेचा कोयना प्रकल्प राज्याच्या वीज व्यवस्थेतील महत्त्वाचा स्तंभ असून, भविष्यातील ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचे आधुनिकीकरण आणि सुरक्षितता अधिक बळकट करण्यावर समितीने भर दिला.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights