पती व सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ करून हॉस्पिटल उभारण्यासाठी माहेरून २५ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
विजय कांबळे – प्रतिनिधी
नागरगावं – शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 1052/2026, भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 115(2), 118(1), 3(5), 351(2), 351(3), 352, 74, 85 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात फिर्यादी महिला 33 वर्षे, रा. बागवाननगर, शिरूर, जि. पुणे, सध्या थेरगाव, पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे पती सासू व सासरे शिरूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, विवाहानंतर आरोपींनी किरकोळ कारणांवरून वारंवार वाद घालून शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच पतीने वेळोवेळी मारहाण व धमकी दिली. दिनांक 26/05/2026 रोजी रात्री 01.00 वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे असताना शिरूर येथे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी माहेरून 25 लाख रुपये आणण्याची मागणी करून पैसे न आणल्यास सोडून देण्याची धमकी दिली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने पतीने मारहाण करून रूममधून फरफटत बाहेर काढले व राजकीय ओळखीचा धाक दाखवून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक काळे मॅडम करीत आहेत.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560





