करडे येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

करडे येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

 

बुद्ध वंदना, त्रिशरण पंचशील व विचारप्रबोधनातून धम्मचक्र प्रवर्तन दिनाला उजाळा

 

करडे | प्रतिनिधी

 

भारतीय बौद्ध महासभा, पुणे अंतर्गत शिरूर तालुका शाखा करडे यांच्या वतीने करडे येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी करडे गावचे उपसरपंच राजेंद्र दादाभाऊ गायकवाड यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दीप व ध्वज प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

 

यावेळी आदिनाथ बाळासाहेब गायकवाड, मंगेश शशिकांत गायकवाड, गौतम दादा गायकवाड, आदित्य सुनील गायकवाड आणि आप्पा रमेश गायकवाड यांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

 

बौद्धाचार्य सुनील जयसिंग गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिशरण, पंचशील व बुद्धपूजापाठ घेण्यात आला. यावेळी त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व विशद करत उपस्थितांना धम्मविचारांचा संदेश दिला.

 

कार्यक्रमास भीमशक्ती तरुण मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक कोंडीबा दगडू गायकवाड (शेलार मामा), प्रसिद्ध उद्योगपती अमोल वामन गायकवाड, निबोध गायकवाड, अमोल मारुती गायकवाड, रितेश राजेंद्र गायकवाड, प्रशांत जाधव, अण्णा पवार आणि शशिकांत बबन गायकवाड यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित खरात यांनी केले. सूत्रसंचालन मच्छिंद्र साहेबराव गायकवाड यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. बौद्धाचार्य सुनील जयसिंग गायकवाड यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले व शेवटी सर्वांचे आभार मानले.

 

धम्म, समता, बंधुता आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देत करडे येथे हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *