पिंपरी दुमाल्यात रावण दहनातून सामाजिक संदेश; पावसासाठी ग्रामस्थांची जगदंबेला प्रार्थना

पिंपरी दुमाल्यात रावण दहनातून सामाजिक संदेश; पावसासाठी ग्रामस्थांची जगदंबेला प्रार्थना

 

शिरूर अर्जुन शेळके

 

पिंपरी दुमाला, ता. शिरूर येथे सोमेश्वर सार्वजनिक नवरात्र उत्सवाची सांगता विजयादशमीच्या दिवशी विविध उपक्रमांनी करण्यात आली. दहा दिवस चाललेल्या नवरात्रोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक जागृती, मनोरंजन आणि समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विजयादशमीच्या दिवशी रावण दहन करून उत्सवाची सांगता करण्यात आली.

 

रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक एकत्र आले होते. परंपरेनुसार रावणाच्या प्रतिकात्मक दहनातून अहंकार, अन्याय आणि वाईट प्रवृत्तींचा नाश होऊन चांगुलपणाचा विजय व्हावा, असा संदेश देण्यात आला. उत्सवाच्या निमित्ताने गावातील नागरिकांमध्ये एकोपा आणि सामाजिक सहभागाची भावना निर्माण झाली.

 

दरम्यान, यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे शेती व्यवसायावर परिणाम होण्याची चिंता शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी रावण दहनानंतर आई जगदंबेच्या चरणी पावसासाठी प्रार्थना करण्यात आली. परिसरात समाधानकारक पाऊस पडून शेतशिवाराला नवसंजीवनी मिळावी, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि दुष्काळी परिस्थितीतून मार्ग निघावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

 

नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत धार्मिक परंपरेसोबत सामाजिक जाणीव जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. विजयादशमीच्या निमित्तानेही या सामाजिक भावनेला अधोरेखित करत ग्रामस्थांनी एकत्र येऊन बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्यामुळे पिंपरी दुमाला येथील विजयादशमी उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *