शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी ऋषिकेश खोरे; युवक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी ऋषिकेश खोरे; युवक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Rjnews27 मराठी – राम कांबळे 

शिरूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिरूर तालुका कार्याध्यक्षपदी तांदळी येथील युवा नेते ऋषिकेश शामराव खोरे यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याने तांदळी गावासह संपूर्ण शिरूर तालुक्यातील युवक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

ऋषिकेश खोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय असून, युवकांना संघटित करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार राहिला आहे. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी युवकांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. त्यामुळे तांदळी गावासह शिरूर तालुक्यातील युवकांमध्ये त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

 

आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांचे विश्वासू सहकारी

 

ऋषिकेश खोरे हे आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांचे खंदे समर्थक व विश्वासू सहकारी म्हणून परिचित आहेत. आमदार कटके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच युवकांना सामाजिक व राजकीय प्रवाहात सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी काम केले आहे. नव्या जबाबदारीमुळे तालुक्यातील युवकांची संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावीपणे करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

 

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना ऋषिकेश खोरे म्हणाले, “आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन. शिरूर तालुक्यातील प्रत्येक युवकाला सोबत घेऊन विकासात्मक आणि सामाजिक कामे अधिक जोमाने करण्याचा प्रयत्न राहील. युवक हेच राष्ट्राची शक्ती असून, त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय राहील.”

 

दरम्यान, त्यांच्या निवडीमुळे शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत होण्यास या नियुक्तीचा फायदा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरूर तालुका अध्यक्ष रवी बापू काळे, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, श्रीगोंदा कारखान्याचे संचालक श्रीनिवास तात्या घाडगे, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष कुंडलिक शितोळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष वीरेंद्र शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कलीम सय्यद, शिरूर शहर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रुतिका झांबरे, शरद साठे, धनंजय शेलार आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *