संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज आषाढी पालखी सोहळा निमित्त मुक्काम वारकरी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिर पार पडले.
प्रतिनिधी शाम जगताप
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे, श्री सदगुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट कृत – श्री सदगुरू शंकर महाराज हेल्थ फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज आषाढी पालखी सोहळा निमित्त पुणे मुक्कामी वारकरी सांप्रदायासाठी शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी जय गणेश प्रांगण, दत्त मंदिरासमोर, बुधवार पेठ, पुणे येथे पार पडलेल्या मोफत आरोग्य शिबीर व मोफत नेत्र तपासणी ११५०० चष्मे वाटपाचे क्षणचित्रे यात २७००० वारकऱ्यांनी लाभ घेतला तसेच २७५ डॉक्टरांनी सहभाग घेतला.
प्रमुख उपस्थित
आरोग्य शिबीर प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र समितीचे अध्यक्ष श्री राजाभाऊ रेवडे ,सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, राजाभाऊ पायमोडे, राजाभाऊ घोडके, राजाभाऊ सूर्यवंशी, रुणाल केसरकर, प्रवीण ढवळे, मनोज वाळुंजकर, सुनील जाधव, विजय कोंढाळकर, तुषार रायकर, राजाभाऊ चव्हाण ट्रस्टचे वैद्यकीय विभाग प्रमुख राजेंद्र परदेशी तसेच सुवर्णयुग तरुण मंडळ आणि सुवर्णयुग सहकारी बँकेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
विशेष सहकार्य
एन. एम. रानडे हॉस्पिटल, धोंडूमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, अष्टांग आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, माणिक संजीवनी, सरला राठोड सोशल वेलफेअर फाउंडेशन, एम. जे. एम. हॉस्पिटल, सिल्वर बर्च मल्टी. हॉस्पिटल, संजीवन हॉस्पिटल, पुणे , टिळक आयुर्वेद मेडिकल कॉलेज
सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, युनिव्हर्सल हॉस्पिटल
या कार्यक्रमासाठी नियोजन व मेहनत मेहनत घेऊन चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला डॉ. दिनेश सूर्यकांत रंगरेज व त्यांची डॉक्टर्स टिम (संपर्क : ७३८५५२२८६४)
डॉक्टर्स युनिट चीफ, पुणे सिटी हयुमन राईटस् , श्री सदगुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट वैद्यकीय सेवा प्रमुख




