*रांजणगाव ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप*

*रांजणगाव ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप*

 

रांजणगाव गणपती

विवेकानंद फंड 

श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट तर्फे मंगलमूर्ती विद्याधाम व परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेंच्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये कटिबद्ध असल्याचे देवस्थान ट्रस्ट च्या अध्यक्षा सौ. स्वातीताई पाचुंदकर पाटील यांनी सांगितले.

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या वतीने श्री मंगलमूर्ती विद्याधाम व परिसरातील सहा वस्त्यांवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना १७,००० ( सतरा हजार ) वह्यांचे मोफत वाटप केले. सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ मुख्य विश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा सौ. स्वातीताई पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, मंगलमूर्ती विध्याधाम चे प्राचार्य गुरुनाथ पाचर्णे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती संगीता पळसकर मॅडम, देवस्थान ट्रस्ट हिशोबणीस संतोष रणपिसे, जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके यांसह सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डोईफोडे सर व संजय वाळके सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *