नागरगाव | विजय कांबळे (प्रतिनिधी)
नागरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवार, दिनांक १५ जून रोजी २०२६-२७ या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात करण्यात आली. शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे पहिल्याच दिवशी शाळा परिसर आनंदाने फुलून गेला होता.
विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा परिसर फुगे व फुलांच्या सजावटीने नटविण्यात आला होता. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन तसेच गोळ्या, बिस्किटे व चॉकलेट वाटप करून खास स्वागत करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण झाले असून पहिल्याच दिवशी त्यांनी आनंददायी वातावरणाचा अनुभव घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य विकास शेलार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रंजीत शितोळे, माजी चेअरमन शरद अण्णा साठे, डॉ. उमेश शेलार, दादासाहेब शेलार सर, युवा उद्योजक सुहास साठे, ललित साठे, सतीश चव्हाण, गंगाधर चव्हाण, निलेश साठे, प्रमोद शेलार, नितीन शेलार, ऋषिकेश चौगुले, लिंबाजी साठे, शिवदास साठे, भाऊसाहेब पवार, सुरेश शिर्के, प्रदीप कांबळे, अनिल आढागळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी झाले. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवले सर यांनी केले, तर मुख्याध्यापक संकपाळ सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.




