कवठेयमाई येथे विदेशी दारूसह एकावर कारवाई; ७ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या विदेशी दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी कारवाई करत ७ हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई कवठेयमाई गावच्या हद्दीत रानवारा हॉटेल समोर करण्यात आली.
याप्रकरणी अविनाश प्रकाश उचाळे (वय ३२, रा. डोंगरगण, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आरोपी हा विदेशी दारूचा साठा विनापरवाना विक्रीसाठी जवळ बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत किंगफिशर बिअर, रॉयल चॅलेंजर व्हिस्की, रोमानोव क्लासिक वोडका, रॉयल स्टॅग व्हिस्की, मॅकडॉवेल नं. १ रम, आयकॉनिक व्हाईट व्हिस्की, ग्रँड मास्टर वोडका आदी विविध ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ७ हजार ५१५ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलीस अंमलदार जी. एस. गोसावी यांनी फिर्याद दिली असून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार चव्हाण करीत आहेत. या कारवाईचे मार्गदर्शन प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *