मांडवगण फराटा येथे शहानुर सय्यद गुरुजी यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न
अल्लाउद्दीन अलवी प्रतिनिधी
ता २८ शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील गायकवाड मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर सेवापुर्ती सोहळ्याचे उद्घाटन व सरस्वती पूजन वाघेश्वर विद्याधाम प्रशाला निवृत्त प्राचार्य अशोक वेदपाठक, पोलीस पाटील बाबासाहेब पाटील फराटे ,पंचायत समिती मा.सदस्य लक्ष्मण बापू फराटे,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र आण्णा नागवडे,मा .संचालक दत्तात्रय आबा फराटे, मा संचालक शंकरराव फराटे इनामदार,मा. सरपंच शिवाजी कदम, मा. सरपंच लतिका जगताप, मा. उपसरपंच महादेव फराटे,सुभाष पाटील फराटे, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष खंडेराव फराटे,वसंतराव फराटे पाटील इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर (पिंटू) पाटील फराटे, तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत फराटे, शिरूर तालुका वारकरी सेवा संघाचे उपाध्यक्ष धनंजय फराटे, शिरूर तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सागर नाना फराटे,मोहन आप्पा फराटे, प्रगतशील शेतकरी अशोक फराटे, लहू नाना मचाले, लाला शेख,साहित्यीक संतोष परदेशी सर, उद्योजक संतोष
फराटे, कॉन्ट्रॅक्टर राहुल फराटे, सचिव संजय नागवडे,तालुका शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सतीश नागवडे सर,मा अध्यक्ष सखाराम सर, गणेगाव दुमाला मा.तंटामुक्ती अध्यक्ष कोंडे गुरुजी,चकोर सर,उदमले सर, राजेंद्र कांबळे सर,कुंभार सर,नामदास सर, ज्ञानदेव आडसूळसर, कोथिंबीर सर आदी सर्व मान्यवर, शिक्षक,ग्रामस्थ , विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना गुरुजींचा जीवनपट पटवून देण्याचा प्रयत्न केला .त्यांच्या सेवेच्या कारकिर्दीत मुलांना क्लास वन अधिकारी घडवण्याचा प्रयत्न केला. अतिशय नम्र परंतु शिक्षण क्षेत्राला पूर्ण वाहून घेतलेले होते. सत्काराला उत्तर देताना शहानुर गुरुजी यांनी सांगितले की जोपर्यंत गायकवाड मळा येथे शिक्षक उपलब्ध होत नाही, तोपर्यंत माझी सेवा निरंतर राहील असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.




