दौंड तालुका पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी संदीप (नाना) जाधव

दौंड तालुका पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी संदीप (नाना) जाधव

पाटस, प्रतिनिधी – योगेश राऊत

ता. १३ : दौंड तालुका पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून अध्यक्षपदी हितेंद्र गद्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कार्याध्यक्षपदी संदीप (नाना) जाधव यांची निवड करण्यात आली आहे. पश्चिम उपाध्यक्षपदी मनोज खंडागळे तर पूर्व उपाध्यक्षपदी अमरसिंग परदेशी यांचीही बिनविरोध निवड झाली.

अध्यक्षपदासाठी जीवन शेंडकर, संतोष काळे आणि राजेंद्र खोमणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र तिघांनीही माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

संघाच्या सचिवपदी बापू नवले, सहसचिवपदी गणेश आनंदा सुळ आणि कोषाध्यक्षपदी मंगेश पायगुडे यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून जीवन शेंडकर, एम. जी. शेलार, त्रिभुज शेळके, गणेश चोपडे आणि गणेश बाजीराव सुळ यांचा समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय, सल्लागारपदी राजू दत्तात्रेय जगदाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा प्रतिनिधी म्हणून रवींद्र खोरकर यांची निवड झाली असून पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या जबाबदारीसाठी दीपक देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. निमंत्रक म्हणून सतीश गुंदेचा कार्य पाहणार आहेत.

कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार वसंत कदम व अशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रकाश शेलार यांनी सूत्रसंचालन केले, तर ज्येष्ठ पत्रकार रमेश वत्रे यांनी आभार मानले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रवी पाटील आणि सुनील भांडवलकर यांनी कामकाज पाहिले.

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळवून देण्याचा तसेच पत्रकार बांधवांचे संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. दरम्यान, विविध स्तरांतून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दौंड पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *