इंदापूर (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यातील कळंब येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कदम व सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना सचिव विरसिंह रणसिंग यांनी विद्यार्थ्यांना सातत्य, मेहनत आणि जिद्द या गुणांच्या जोरावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. उपाध्यक्ष प्रकाश कदम यांनी स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य विकसित करून समाजात आदर्श निर्माण करण्याचा संदेश दिला. प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी गौरव प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील अनुभव सांगत उपस्थितांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्राचार्य प्रशांत शिंदे यांनी केले, तर वार्षिक अहवालाचे वाचन उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी सादर केले.
सूत्रसंचालन प्रा. सोनाली चव्हाण, क्रीडा संचालक सुहास भैरट व प्रा. विद्या गुळीग यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. रामचंद्र पाखरे यांनी केले.
या प्रसंगी प्रा. विलास बुवा, प्रा. विजय केसकर, प्रा. राजेंद्रकुमार डांगे, प्रा. ज्योत्स्ना गायकवाड, ग्रंथपाल विनायक शिंदे तसेच प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— विकास साळुंके, प्रतिनिधी (दौंड) | Rjnews27 मराठी





