राज्यस्तरीय यशाची दखल; उपसभापती सासवडे यांच्याकडून संतोष काळे पाटील यांचा गौरव*

*राज्यस्तरीय यशाची दखल; उपसभापती सासवडे यांच्याकडून संतोष काळे पाटील यांचा गौरव*

रांजणगाव गणपती प्रतिनिधी

शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालय ग्रामपंचायत शिक्रापूर यांनी अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती करत राज्यस्तरावर नावलौकिक मिळवला आहे. या वाचनालयाचे आदर्श ग्रंथपाल संतोष काळे पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
हा सन्मान शिरूर पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती मा. श्री. रामभाऊ बबनराव सासवडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, शिक्रापूर येथे संपन्न झाला.
वाचन संस्कृतीचा प्रसार, विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि वाचनालयाचे उत्कृष्ट व्यवस्थापन यामुळे या वाचनालयाने अनेक सन्मानासह राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. या यशामागे उच्च विद्याविभूषित अनेक विषयांचा व्यासंग असलेले कवी लेखक ग्रंथपाल श्री.संतोष दशरथ काळे पाटील यांचे परिश्रम आणि दूरदृष्टी महत्त्वाची ठरली आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी शिंदे,ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी,स्थानिक नागरिक, दिव्यांग बांधव व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *