कानगाव येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांची भेट

 


कानगाव येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांची भेट

दौंड (प्रतिनिधी विकास साळुंके) – दौंड तालुक्यातील कानगाव येथे सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला आज शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शेतकरी प्रश्नांवर मार्गदर्शन करताना सरकारवर जोरदार टीका केली.

घनवट म्हणाले की, “कृषीप्रधान देशात सरकार कष्टकरी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, परंतु वास्तवात सरकार नेहमी खाणाऱ्यांच्या बाजूनेच उभे राहते. शेतीमालाचे दर वाढले की शहरांमध्ये बोंबाबोंब होते व त्यानंतर सरकार बाजारभाव पाडते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. कोणत्याही शेतीमालाला रास्त बाजारभाव देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. शेतीमालावरील सर्व निर्बंध हटवून शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत थेट प्रवेश दिला, तरच शेतकऱ्यांचे खरे भले होईल.”

या वेळी आप्पासाहेब कोहराळे, भारता शिंदे, लालचंद कोळपे, संतोष गायकवाड, विजय जाधव, अण्णा पराठे, अर्जुन गवळी, बबन चैडवर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *