भव्य रक्तदान शिबिर आणि लकी ड्रॉचे आयोजन — शिवजयंती उत्सव समिती बाभुळसर बु. यांचा उपक्रम
बाभुळसर बु. (ता. शिरूर, जि. पुणे) — रक्तदान हे श्रेष्ठ दान या उदात्त हेतूने शिवजयंती उत्सव समिती, बाभुळसर बु. यांच्या विद्यमाने आणि सह्याद्री ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने १५ ऑगस्ट २०२५ रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृह, बाभुळसर बु. येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबीर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार असून, इच्छुकांनी या सेवाभावी उपक्रमात सहभागी होऊन गरजू रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने पाण्याचा JR (जार) भेट म्हणून दिला जाणार आहे.
लकी ड्रॉचे विशेष आकर्षण
या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भव्य लकी ड्रॉ. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक डोनरच्या नावाची चिठ्ठी बंद पेटीत टाकली जाईल.
सायंकाळी ५.३० वाजता सर्वांच्या उपस्थितीत सोडत काढून पहिल्या तीन भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
बक्षिसांची यादी
🥇 प्रथम बक्षीस: ३२ इंची व्हिडिओकॉन LED टीव्ही 📺
🥈 द्वितीय बक्षीस: Vivo Y19 मोबाईल 📱
🥉 तृतीय बक्षीस: रेंजर सायकल 🚲
आयोजक:
शिवजयंती उत्सव समिती, बाभुळसर बु.
स्थळ: विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृह, बाभुळसर बु., ता. शिरूर, जि. पुणे.
भव्य रक्तदान शिबिर आणि लकी ड्रॉचे आयोजन — शिवजयंती उत्सव समिती बाभुळसर बु. यांचा उपक्रम
हाच धर्म — चला, रक्तदान करून जीव वाचवूया! 🩸





