आपले दुःख विसरून परक्यांची सेवा करणारा माणूस – ‘मन शांती आश्रम’ चे उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते”

आपले दुःख विसरून परक्यांची सेवा करणारा माणूस – ‘मन शांती आश्रम’ चे उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते”,

अहिल्यानगर

आज जेव्हा स्वार्थी जगात आपापल्या सुखाचा विचार करणारे अनेक लोक दिसतात, तेव्हा काही माणसं अशीही असतात की जी स्वतःच्या दुःखांवर मलम लावत नाहीत, पण इतरांच्या जखमांवर प्रेमाचा फुंकर घालतात. विजय पंडित हे त्यांच्यातलेच एक.

मन शांती आश्रम’ – अंध, अपंग, निराधार, आणि वयोवृद्धांसाठी उभारलेला आश्रम – याचे उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते संपन्न झाले आणि त्यांचा आवाजही क्षणभर थरथरला. त्यांनी भावनिक शब्दांत कृतज्ञता व्यक्त करत सांगितले.

मी असे खूप कार्यक्रम पाहिलेत, पण हे कार्य बघून मन हेलावलं… या माणसाकडे पैसा नाही, सत्ता नाही, तरीही त्याचं मन इतकं मोठं आहे की त्याने स्वतःच्या घराची बाजू केली आणि इतरांच्या आयुष्याला घर दिलं.”

 

घरातला गरीब, पण मनाने श्रीमंत

विजय पंडित हे नाव त्या व्यक्तिमत्वाचं आहे ज्यांनी आपल्या निवृत्तीनंतर मिळालेल्या २० लाख रुपयांची पुंजी – जी त्यांच्या संपूर्ण आयुष्याची कमाई होती – ती अपंग, अंध आणि निराधार व्यक्तींकरिता आश्रम उभारण्यासाठी खर्च केली.

मोठा मुलगा रिक्षा चालवतो. छोटा मुलगा पुण्यात ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. घरातले आर्थिक स्रोत मर्यादित – पण मनातल्या माणुसकीची मर्यादा नाही.

 “मी पाहिलं की समाजात कोणी यांच्यासाठी नाही, म्हणून ठरवलं – मीच यांचा बाप होईल, मीच यांचा आधार,” विजय पंडित हे सांगताना डोळ्यांत अश्रू तरळले.

 

खासदारांचा भावनांनी भरलेला शब्द

खासदार निलेश लंके यांनीही भावूक होऊन आश्वासन दिलं:

> “तुम्ही जर असं निर्णय घेऊ शकता, तर मी सुद्धा तुम्हाला एकटा नाही सोडणार. हा आश्रम केवळ इमारत नाही, ही एक तपश्चर्या आहे. तुमचं कार्य थांबू नये म्हणून मी सदैव पाठीशी राहीन.”

 

एक निस्वार्थ कुटुंब – माणुसकीचा जिवंत नमुना

विजय पंडित आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हा एक उदाहरण आहे – ज्यांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांचं आयुष्य उजळावं म्हणून आपल्या आयुष्याचं सर्वस्व समर्पित केलं. मन शांती आश्रम हे केवळ एक निवारा नाही, ते एक माणुसकीचं मंदिर आहे – जिथं प्रेम, काळजी आणि आदराने जगता येतं.
जिथं मन शांती मिळते – तिथं ईश्वर नक्की असतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *