*” द्या एक हात मदतीचा, सामाजिक बांधीलकीचा, शैक्षणिक क्रांतीचा ” या उपक्रमास उन्नतनगर अक्षय को ऑप. हौसिंग सोसायटीच्या माध्यमातून अजयजी देशलेहरा यांच्या सहकार्याची भरघोस साथ…*

” द्या एक हात मदतीचा, सामाजिक बांधीलकीचा, शैक्षणिक क्रांतीचा ” या उपक्रमास उन्नतनगर अक्षय को ऑप. हौसिंग सोसायटीच्या माध्यमातून अजयजी देशलेहरा यांच्या सहकार्याची भरघोस साथ…

 

सह्याद्रीचा आवाज *बोरघर, माणगांव विश्वास गायकवाड*

      गोरेगाव मुबंई येथील उन्नतनगर – अक्षय को ऑप. हौसींग सोसायटी यांचे माध्यमातून, रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील हातोंड, कसईशेत, माठल, चंदरगांव येथील रा जि प शाळेतील मुलांना आणि माध्यमिक विद्यालय चंदरगांव येथील मुलांना मागील दोन महिन्यापूर्वी सायकल, पुस्तके, खाऊ वाटप करण्यात आले होते. या दरम्यान या सोसायटीचे चेअरमन – मा. कानमलजी देशलेहरा, आणि सहकारी मा. विवेकानंद सावंत, मनिष देशलेहरा यांनी येथील मुलांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या, ही बाब त्यांनी सोसायटीच्या मान्यवर मंडळीपुढे व्यक्त केली आणि वयोमानाने आजारी असूनही या संस्थेचे सदस्य मा. अजयजी देशलेहरा यांनी आपल्या चिरंजीवास सांगितले की, बिकट परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या मुलांना आपण मदतीचा हात दिलाच पाहिजे. 

यानुसार, कानमलजी देशलेहरा आणि विवेकानंदजी सावंत यांनी सुधागड तालुक्यातील हातोंड गावचे सुपुत्र मुबंई पोलीस हवालदार राजेंद्र वाघमारे यांचेशी संपर्क साधून या भागातील शिक्षित मुलांची वयोमानानुसार माहिती मागवून घेतली. रा जि प शाळा – महागाव, देऊळवाडी चंदरगांव, हातोंड, माठल, केलगान, गोंदाव, कसईशेत, पत्र्याची वाडी आणि माध्यमिक विद्यालय चंदरगांव येथील ऐकूण 358 मुलांना सॅंडल, दप्तर, व अन्य साहित्याचे वाटप राजेशजी अजय देशलेहरा यांच्या माध्यमातून करण्यात आले.

        सर्वच शाळेतील मुलांनी आदरणीय दानशूर मान्यवरांचा यथोचित सन्मान करून स्वागत करण्यात आले, लहानग्या आणि आदिवासी व आर्थिक गरीब मुलांनी केलेले स्वागताचा हा क्षण चिरकाळ स्मरणात राहणारा ठरला. यावेळी मा. राजेशजी देशलेहरा म्हणाले की, आमच्या वडिलांनी आम्हांला लहानपणा पासून एक शिकवण दिली आहे की, ” गरजवंताना मदतीचा हात द्या. गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी केलेली मदत हीच खरी ईश्वर सेवा आहे “. तुम्ही मुलांनी तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खुप शिका आणि आय ए एस, आय पि एस असे मोठे अधिकारी बना. यासाठी आम्ही तुम्हांला कायम मदत करत राहू. तसेच, सोसायटीचे चेअरमन – कानमल देशलेहरा, आणि विवेकानंदजी सावंत यांनी देखील आपले विचार व्यक्त करून मुलांना शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन दिले. 

         ” द्या एक हात मदतीचा, सामाजिक बांधिलकीचा, शैक्षणिक क्रांतीचा ” या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या 13 वर्षांपासुन अनेक दानशूर व्यक्ती व संघटना यांच्या माध्यमातून अखंडितपणे सेवाभावी कार्य करणारे, मुबंई पोलीस दलातील पोलीस हवालदार – राजेंद्र वाघमारे यांनी मा. अजयजी देशलेहरा यांचे विशेष ऋण व्यक्त केले. देव देवळात असतो की माणसाच्या हृदयात असतो याचा शोध घेतल्यास देव माणसाच्या हृदयात असतो हे मा. अजयजी देशलेहरा यांच्यासारख्या आदर्शवत व्यक्तीकडे पाहिल्यावर कळून येते. स्वतः वयोमानाने आजारी असूनही उच्य कोटीची दान प्रवृत्ती ही वंदनीय आहे. ” जसा बाप तसा बेटा ” ही मराठीमध्ये एक म्हण आहे या नुसार राजेशजी देशलेहरा हे आपल्या वडिलांच्या दिशादर्शक मार्गाने चालताना दिसत आहेत. मुलांना शिक्षणासाठी आपल्या गावाबाहेरील असे हे अपरिचित व्यक्ती मदत करत आहेत याची खुणगाठ मनात बांधून ठेवावी आणि खुप शिकून मोठे होऊन आपणही समाजातील अशा दुर्लक्षित दुर्गम आर्थिक गरिबी भोगत असणाऱ्या मुलांना शैक्षणिक दृष्टया मदतीचा हात देऊन, आज तुम्हांला जे मदत करत आहेत त्याचे कर्ज परतफेड करावे. 

        यावेळी, उन्नतनगर अक्षय को ऑप. हौसिंग सोसायटीचे मा. कानमलजी देशलेहरा, व विवेकानंद सावंत, मनिष देशलेहरा, राजेश देशलेहरा, मधुकर बनसोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

        तसेच, माध्यमिक विद्यालय – चंदरगांवचे, कृष्णा हेमाडे सर ( मुख्याध्यापक ), सहशिक्षक – आबा ठोंबरे सर, विजय शिंदे सर, सुनील घोगले सर, सदानंद कोलीस्ते सर…

रा जि प शाळा – चंदरगांवचे, एस एम सी अध्यक्ष – सुनील घोगले, मुख्याध्यापक – मुकुंद भडवलकर, सहशिक्षक – श्वेता सरोदे मॅडम, प्रतिज्ञा भदेकर मॅडम, हेमा गिरी मॅडम, माजी विद्यार्थी संघ सचिव – दर्शन चव्हाण…..

रा जि प शाळा – महागावचे, मुख्याध्यापिका – उर्मिला मिरजगावे मॅडम, सहशिक्षक – आश्रूजी वानखेडे सर, प्रिया कळमकर, अंगणवाडी मदतनीस – माडे ताई…

रा जि प शाळा – देऊळवाडीचे सचिन कदम सर,

रा जि प शाळा – हातोंड चे, मुख्याध्यापक – अंकुश काकरा सर, सहशिक्षिका – सिमा फुंदे मॅडम,

रा जि प शाळा – माठल चे मुख्याध्यापक – इरवंत रचवार सर, सहशिक्षक – लहु जायभाऐ सर.

रा जि प शाळा – केलगान चे मुख्याध्यापक – तुषार अडसूल सर, सहशिक्षक – गोकुळ गायकवाड सर.

रा जि प शाळा – गोंदाव चे मुख्याध्यापक – देविदास जाधव सर, सहशिक्षक – संदीप देशमुख सर.

रा जि प शाळा – कसईशेत चे मुख्याध्यापिका – रेखा पाटील मॅडम, सहशिक्षक – सचिन कदम सर.

रा जि प शाळा – पत्र्याचीवाडी चे मुख्याध्यापक – संदीप म्हात्रे सर.

यांनी शाळेच्या वतीने स्वागत, नियोजन,शिस्तप्रियता दर्शवून दानदाते व मान्यवर मंडळीचे आभार मानले.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *