गलांडवाडीच्या सुनेची जिद्द, मेहनत आणि चिकाटीला यश; दिपाली शिंदे यांची बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती

गलांडवाडीच्या सुनेची जिद्द, मेहनत आणि चिकाटीला यश; दिपाली शिंदे यांची बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती

 

नागरगाव–गलांडवाडी, ता. दौंड | प्रतिनिधी – विजय कांबळे

 

गलांडवाडी येथील सून सौ. दिपाली शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांच्या या यशामुळे गलांडवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

दिपाली शिंदे यांचा यशाचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. घरची परिस्थिती नाजूक असतानाही त्यांनी परिस्थितीसमोर हार न मानता शिक्षण आणि करिअरचे ध्येय कायम ठेवले. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. प्रतिकूल परिस्थितीतही ध्येयापासून विचलित न होता केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.

 

ग्रामीण भागातून आलेल्या महिलेसाठी हे यश विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण, आत्मविश्वास, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे दिपाली शिंदे यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.

 

विशेषतः ग्रामीण भागातील मुली आणि महिलांसाठी त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी ठरणारा आहे. महिलांना केवळ सन्मान देण्यापेक्षा त्यांच्या संघर्षातून आणि कर्तृत्वातून समाजाने प्रेरणा घेणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी होऊन मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिपाली शिंदे यांच्या यशातून मिळते.

 

त्यांच्या या उल्लेखनीय नियुक्तीबद्दल गलांडवाडी तसेच परिसरातील ग्रामस्थ, महिला वर्ग, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नव्या जबाबदारीतही त्या उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

 

दिपाली शिंदे यांचे यश हे केवळ एका कुटुंबाचा किंवा गावाचा अभिमान नसून, प्रतिकूल परिस्थितीतही ध्येयासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येक महिला आणि तरुणीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *