झेप फाउंडेशन पुणे व मानवधर्म फाउंडेशन यांच्यावतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बंधू-भगिनींना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

झेप फाउंडेशन पुणे व मानवधर्म फाउंडेशन यांच्यावतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बंधू-भगिनींना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रतिनिधी शाम जगताप

 

 

 

१ मे रोजी झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य व मानवधर्म फाउंडेशन यांच्यावतीने समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवकांचा श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम आंबा माता मंदिराजवळ कात्रज पुणे येथे सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये फाउंडेशनच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक व्यक्ती हा विविध घटकातील जसे की आरोग्य, शिक्षण ,पर्यावरण ,पत्रकारिता , व इतर आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करून लोकांना सेवा देणाऱ्या व्यक्तीचा मान सन्मान करून त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कौतुकाची थाप देणे गरजेचे असते या उद्देशाने झेप फाउंडेशनच्या वतीने असे सामाजिक उपक्रम व कार्यक्रम घेतले जाते जेणेकरून त्या कर्तुत्वान व्यक्तीचा आदर्श घेऊन समाजातील इतर घटक व युवा पिढी समाजकार्याच्या मार्गाने व एकमेकाला मदत करण्याची त्यांच्यामध्ये भावना जागृत व्हावी व खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीला खरोखरच मदतीची गरज आहे त्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य हे मानवाच्या हातून घडावे या उद्देशाने समाजातील कर्तुत्वान बंधू-भगिनींना पुरस्कार सन्मानपत्राच्या स्वरूपाने त्यांचे कौतुक करतो.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी तहसीलदार सामाजिक कार्यकर्ते मा.शिरीष
सपकाळ सर तसेच मानवधर्म फाउंडेशनचे मधुसूदन कोरेकर सर, डॉ. दिनेश रंगरेज सर ,झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक /अध्यक्ष, युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश सहसचिव, पोलीस तपास क्राईम रिपोर्टर, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनेल प्रतिनिधी ,बाळकडू ,सेवाशक्ती पत्रकार कांताभाऊ राठोड, श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रमच्या अध्यक्षा सीमाताई तसेच सामाजिक कार्यकर्ते व झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष चेतन भाऊ शर्मा ,विठ्ठल माने सर हडपसर विधानसभा अध्यक्ष,दत्ताभाऊ जरांडे खडकवासला विधानसभा अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते , सुखकर्ता सामाजिक प्रतिष्ठान चे सचिव संजय कारंडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप खिलारे व इतर मान्यवर तसेच विविध घटकातील सामाजिक कार्यकर्ते बंधू-भगिनी यांना सन्मानपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख मान्यवर तसेच विविध घटकातील सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व आपल्या कार्याची थोडक्यात माहिती सांगितली
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन दत्ताभाऊ जरांडे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *