असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम कार्ड योजना – अर्ज प्रक्रिया सोपी
भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू केलेली ई-श्रम योजना ही एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना अपघात विमा, पेन्शन योजना, रोजगार संधी, कौशल्य विकास इत्यादी अनेक फायदे मिळणार आहेत.

ई-श्रम कार्ड म्हणजे काय?
ई-श्रम कार्ड हे 12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असलेले डिजिटल ओळखपत्र आहे. या कार्डच्या मदतीने असंघटित क्षेत्रातील कामगारांना विविध सरकारी योजनांचा थेट लाभ मिळणार आहे

पात्रता कोणाला?
वय 16 ते 59 वर्षे असावे
असंघटित क्षेत्रातील कामगार असावा
आधार कार्ड व त्यास लिंक केलेला मोबाईल नंबर आवश्यक
आयकर भरणारे किंवा EPFO/ESIC सदस्य यासाठी पात्र नाहीत.

आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो, पत्ता पुरावा तसेच शैक्षणिक/व्यवसाय प्रमाणपत्र (असल्यास).

अर्ज प्रक्रिया
कामगारांनी अधिकृत वेबसाइट https://eshram.gov.in वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करता येईल. मोबाईलवर OTP मिळाल्यानंतर वैयक्तिक व बँक माहिती भरून अर्ज पूर्ण करता येतो. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर कामगारांना 12 अंकी UAN नंबरसह ई-श्रम कार्ड डाउनलोड करता येईल. मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर नजीकच्या CSC केंद्रात जाऊन बायोमेट्रिक नोंदणी करता येईल.
फायदे
अपघात विमा : मृत्यू झाल्यास ₹2 लाख, अपंगत्व झाल्यास ₹1 लाख पर्यंत संरक्षण
पेन्शन योजना : 60 वर्षांनंतर ₹3,000 प्रति महिना पेन्शन
रोजगाराच्या संधी व कौशल्य प्रशिक्षण
आपत्कालीन आर्थिक मदत व इतर सरकारी योजनांचा थेट लाभ
महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी अर्ज करण्याची कोणतीही अंतिम तारीख नाही आणि अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. अर्ज करताना काही अडचण आल्यास कामगारांनी 14434 या टोल-फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधावा.




