बोरी पारधी येथे रस्ते विकास कामांचा शुभारंभ…

  बोरी पारधी येथे रस्ते विकास कामांचा…..

आ. राहुल कुल यांच्या पाठपुराव्यामुळे 10.50 लाखांचा निधी मंजूर

दौंड (प्रतिनिधी : विकास साळुंके) :
दौंड तालुक्यातील बोरी पारधी गावामध्ये जनसुविधा निधीतून रस्ते विकासाची कामे सुरु होणार आहेत. आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद पुणे यांच्या जनसुविधा निधीतून हिवाळे कॉलनी, वार्ड क्रमांक २ या भागातील रस्त्यांच्या कामांसाठी रुपये 10.50 लाखांचा निधी मंजूर झाला असून, आज या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास बोरी पारधीचे सरपंच बी.डी. सोडनवर, तसेच मान्यवरांमध्ये सुनील सोडनवर, जयदीप सोडनवर, सरला शर्मा, पप्पू शेठ बर्वे, शेखर सोडनवर, भानुदास नेवसे, सुरेश ताडगे, योगेश कोळपे, दत्ता नेवसे, उद्धव गायकवाड, प्रदीप सोडनवर, सुरज शर्मा, राजन चित्रे आदी उपस्थित होते.

या कामामुळे स्थानिक नागरिकांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार असून, हिवाळे कॉलनी परिसरातील दीर्घकालीन रस्त्यांचा प्रश्न सुटणार आहे. नागरिकांनी आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांचे व गावातील पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *