शिरूर तालुक्यात भरधाव टेम्पोची धडक – शेतकरी जखमी, चालक फरार…

📰 शिरूर तालुक्यात भरधाव टेम्पोची धडक – शेतकरी जखमी, चालक फरार

शिरूर (पुणे) : शिरूर तालुक्यातील पुणे–अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा प्रकार 18 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिरूर गाव हद्दीत जान्हवी हॉटेलजवळ, गोलेगाव पुलाजवळ घडला.

फिर्यादी हनुमंत साधु गरदडे (वय 33, रा. निमोणे कु.हाडवाडी, ता. शिरूर) हे जागेवर थांबलेले असताना, चॉकलेटी रंगाचा टेम्पो (क्रमांक MH-16-CD-8089) भरधाव वेगात व रॉंग साईडने येत अचानक वळवण्यात आला. यावेळी टेम्पोची धडक बसून गरदडे यांच्या डाव्या पायावरून चाक गेल्याने पायाला गंभीर दुखापत झाली असून मांडीत व तळपायाला फ्रॅक्चर झाले आहे.

अपघातानंतर चालकाने थांबण्याऐवजी घटनास्थळावरून पसार होत पळ काढला. या प्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 125 (A)(B), 281 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा तपास पोहवा कोथळकर करत असून प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *