झाडांमध्ये वाढदिवसाचा उत्सव!
महेंद्र बिडगर यांचा अभिष्टचिंतन सोहळा निसर्गाच्या सानिध्यात;
वृक्षप्रेमी उमेश रणदिवेंना ११ हजार रुपयांचा सन्मान
प्रतिनिधी- विजय कांबळे

नागरगावं – शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उपाध्यक्ष महेंद्र बिडगर यांनी आपला वाढदिवस यंदा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला. कोणताही अनावश्यक खर्च न करता, त्यांनी रांजणगाव सांडस येथील माळरानावर झाडांच्या सानिध्यात आपल्या मित्र व सहकाऱ्यांसमवेत वृक्षारोपण करत वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा पार पाडला.
यावेळी त्यांनी निसर्गप्रेमी व वृक्षसंवर्धक म्हणून ओळख असलेल्या उमेश रणदिवे यांच्याकडे भेट दिली. उमेश रणदिवे यांनी या उजाड माळरानावर हजारो औषधी व आयुर्वेदिक झाडांचे संगोपन करत एक हिरवळ निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून महेंद्र बिडगर यांच्या वतीने त्यांना ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
या सोहळ्याला शिरूर तालुका अध्यक्ष कुंडलिक नाना शितोळे, नागरगाव विकास सोसायटीचे मा चेअरमन शरद अण्णा साठे, मा चेअरमन आबासो महादेव साठे, चेअरमन अशोक खुळे, माजी उपसरपंच कमलाकर साठे, माजी चेअरमन सतीश पवार, युवा उद्योजक हेमंत दादा साठे, युवा उद्योजक सुभाष शेलार, युवा उद्योजक पोपट साठे , सचिन भैया साठे,सोमनाथ साठे, महेश निंबाळकर, अमित पोळ, हनुमंत शेलार आदी मान्यवरांसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
महेंद्र बिडगर यांनी सांगितले, “अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाल्याचा खूप आनंद झाला. समाजासाठी काहीतरी सकारात्मक देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.”
या उपक्रमामुळे सामाजिक भान राखणारा आणि पर्यावरणाचा सन्मान करणारा एक प्रेरणादायी संदेश सर्वत्र पोहोचला आहे.




