बाभुळसर बुद्रुक येथे पत्रकार अल्लाउद्दीन अलवी दाम्पत्याचा उमरा आभार समारंभ उत्साहात

बाभुळसर बुद्रुक, ता. शिरूर, जि.पुणे

(प्रतिनिधी : बालाजी कांबळे) — बाभुळसर बुद्रुक येथील ज्येष्ठ पत्रकार अल्लाउद्दीन अलवी आणि त्यांच्या पत्नी रुकसाना अलवी यांनी सौदी अरेबियातील पवित्र मक्का-मदिना येथे उमरा यात्रा पूर्ण केल्यानंतर त्यांच्या वतीने आभार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिरूर तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात शिरूर-हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या पत्नी मनीषाताई कटके यांच्या हस्ते पत्रकार अल्लाउद्दीन अलवी व त्यांच्या पत्नी रुकसाना अलवी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. उमरा प्रवास पूर्ण करून सुखरूप परतल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या आभार समारंभाला आपुलकीचे आणि आनंदाचे वातावरण लाभले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अलवी दाम्पत्याला उमरा प्रवासाबद्दल शुभेच्छा देत पुढील आयुष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. धार्मिक श्रद्धेसोबतच विविध समाजघटकांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम सामाजिक सलोखा आणि परस्पर स्नेहाचा संदेश देणारा ठरला.

 

मनीषाताई कटके यांनी व्यक्त केल्या शुभेच्छा

प्रसारमाध्यमांशी बोलताना मनीषाताई कटके यांनी पत्रकार अल्लाउद्दीन अलवी व त्यांच्या पत्नी रुकसाना अलवी यांनी सौदी अरेबियातील मक्का-मदिना येथे उमरा करण्याचे भाग्य लाभल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अलवी कुटुंबाला हा धार्मिक प्रवास सुखकर आणि समाधानकारक झाल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, उपाध्यक्ष बाळासाहेब नाना नागवडे, सरपंच दिपालीताई नागवडे, उपसरपंच मोहिनी रणदिवे, सदस्या मनिषा नागवडे, शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र गदादे, परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष हनुमंत पाटोळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे उपाध्यक्ष महेंद्र नागवडे, माजी सरपंच अरुणदादा नागवडे, सरपंच सुनील फलके, ‘महाराष्ट्राची भूमी’चे संपादक आनंदा बारवकर, भीमा घोड अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष संतोष नारायण नागवडे, माजी उपसरपंच राजेंद्र नागवडे, माजी उपसरपंच रविंद्र बापू टेकवडे, माऊली फराटे, नवेश गवळी, अध्यक्ष सुनील ढमढेरे, चेअरमन किशोर नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे उपाध्यक्ष कृष्णाजी नागवडे, उद्योजक दिगंबर शितोळे, सोमनाथ नागवडे, माजी चेअरमन राजेंद्र नागवडे, चेअरमन दत्तात्रय वाल्मीक नागवडे, सगाजी नागवडे, कृष्णाजी थोरात, संतोष स. नागवडे, संतोष टेकवडे, पत्रकार राजेंद्र कांबळे, संतोष नागवडे, चेअरमन शामराव ढमढेरे, संभाजी फराटे गुरुजी, घुटे सर, महेंद्र रणदिवे सर, जाकीरभाई काझी, सलीमभाई शेख, नानाभाई शेख, रमजान शेख, अल्ताफ शेख, चांद सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने अल्लाउद्दीन अलवी यांनी उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थांचे आभार मानले. उमरा यात्रेच्या निमित्ताने मिळालेल्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या आभार समारंभामुळे बाभुळसर बुद्रुक परिसरात सामाजिक, धार्मिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींचा स्नेहपूर्ण मेळावा पाहायला मिळाला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *