पाटसमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत; पुणे-सोलापूर एक्सप्रेस वेकडून वारकऱ्यांसाठी सेवा उपक्रम

प्रतिनिधी – योगेश राऊत | पाटस | दि. १४ जुलै २०२६

जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मंगळवार (दि. १४) रोजी भक्तिमय वातावरणात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड गजरात पाटस येथे दाखल झाला. पालखीच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, हजारो वारकरी टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात मार्गक्रमण करत असल्याने पाटस परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

सालाबादप्रमाणे यंदाही पुणे-सोलापूर एक्सप्रेस वे प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे वाटप करण्यात आले. तसेच वैद्यकीय तपासणी व आरोग्यसेवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. दीर्घ पायी प्रवासामुळे थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांची मालिश करून त्यांना दिलासा देण्यात आला. या सेवाभावी उपक्रमाला वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आयोजकांचे आभार व्यक्त केले.

 

या सेवा उपक्रमाला पुणे-सोलापूर एक्सप्रेस वे प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शशी भाटिया व त्यांच्या पत्नी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून वारकऱ्यांची विचारपूस केली आणि सेवा उपक्रमात सहभाग घेतला. तसेच PSEPL टीम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन करण्यात आले.

 

यावेळी राजेश सिंग, सुरजित सिंग, संजय सिंग, अभिजीत शिंगारे, गुलाब शेख, प्रवीण कांबळे, ऍड योगेश सरोदे, वसीम शेख, प्रल्हाद रोटे, भरत साबरे , कल्पेश वाघ, भगत देवरे,राहुल गायकवाड, मच्छिंद्र पवार,प्रशांत नवले, अक्षय नरुटे ,शुभम मिसाळ, विलास मोलावडे,भानुदास दिवेकर, गोरख काळे,मनीष काळभोर, विशाल पवार, संदीप झाल्टे , मनोज भिडे , मयुर गायकवाड, शक्ती पानसरे,रावसाहेब सोनकांबळे, अमोल बंडगर, किरण शितोळे, रमेश बारवकर, अमोल म्हेत्रे, सचिन अवघडे,जगताप मॅडम आणि गुंड मॅडम यांच्यासह पुणे-सोलापूर एक्सप्रेस वे प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

वारकरी संप्रदायातील सेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पालखी सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली. वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत पुणे-सोलापूर एक्सप्रेस वे प्रायव्हेट लिमिटेडने आपली सामाजिक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *