एसआरपीएफमध्ये कार्यरत असलेले स्वप्नील गेडाम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

एसआरपीएफमध्ये कार्यरत असलेले स्वप्नील गेडाम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

प्रतिनिधी / राम कांबळे

 

दौंड येथील एसआरपीएफमध्ये कार्यरत असलेले स्वप्नील गेडाम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त त्यांच्यावर मित्रपरिवार, सहकारी व शुभचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

मनमिळाऊ स्वभाव, सर्वांशी आपुलकीने वागणारे आणि नेहमी हसतमुख राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून स्वप्नील गेडाम यांची ओळख आहे. लहानपणापासूनच देशसेवेची आवड जोपासत त्यांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने वाटचाल केली. त्यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण दौंड येथेच पूर्ण झाले.

 

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी देशसेवेचे स्वप्न साकार करत एसआरपीएफमध्ये प्रवेश केला आणि सध्या ते दौंड येथे कर्तव्य बजावत आहेत. आपल्या सेवाकाळात त्यांनी जबाबदारी, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श निर्माण केला आहे.

 

स्वप्नील गेडाम यांचा जनसंपर्क मोठा असून विविध स्तरांतील लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. देशसेवेसोबतच त्यांना सामाजिक कार्याचीही विशेष आवड असून अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये ते सक्रिय सहभाग घेत असतात. त्यांच्या कार्याची आणि साध्या, सकारात्मक स्वभावाची अनेकांकडून प्रशंसा केली जाते.

 

त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून यश लाभो, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *