खंडाळे येथे सहाय्यक राज्यकर आयुक्त कु. प्रतिक लांडे यांच्यासह विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर नागरी सत्कार; शिक्षण, वाचनालय व शैक्षणिक सुविधांवर भर

, प्रतिनिधी :Rjnews 27 मराठी 

खंडाळे गावामध्ये विविध स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा जाहीर नागरी सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अखंड हरिनाम सप्ताह यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ खंडाळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर नियुक्ती झालेले कु. प्रतिक लांडे यांच्यासह कृषी अधिकारी अनुजा नरवडे, केंद्रप्रमुख मिलिंद जी. आबनावे, ॲड. आदित्य नरवडे, ॲड. मयुर नरवडे, ॲड. प्राची दरवडे, ॲड. ऋतुजा आबनावे तसेच पोलिस शिपाई वैशाली नरवडे यांचा फेटा, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात सत्कारमूर्ती तसेच उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत ग्रामीण भागातील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविणे, गावात सुसज्ज वाचनालय उभारणे, माध्यमिक शाळेची सुविधा उपलब्ध करणे तसेच शैक्षणिक व पायाभूत सुविधांचा विकास करण्याची गरज यावर भर देण्यात आला.

नवनियुक्त अधिकारी व कायद्याच्या अभ्यासकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सत्कारमूर्तींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या जोरावरच यश मिळते, यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, असा प्रेरणादायी संदेश दिला.

या कार्यक्रमास पोलिस पाटील पंडीत खेडकर, विशाल नळकांडे, अरूण पांढरकर, अमृता दरवडे, संदीप नरवडे, दत्तात्रय बांगर, बाळासाहेब नरवडे, रोहिदास आबनावे, पोपट आबनावे, संपत नरवडे, दिनेश नरवडे, कुशल नरवडे यांच्यासह गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर, बहुसंख्य ग्रामस्थ, माता-भगिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश बापू नरवडे यांनी केले, तर चेअरमन सुभाष दरवडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *