माणूस परिवार महाराष्ट्र राज्य प्रणित आदर्श कार्यकर्ता गौरव सामाजिक पुरस्कार प्रदान :शरद निकम
प्रतिनिधी शाम जगताप
२ जुन मंगळवार रोजी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड नवी पेठ पुणे येथे माणूस परिवार महाराष्ट्र राज्य प्रणित आदर्श कार्यकर्ता गौरव पुरस्कार संपन्न झाला .त्यावेळी मा. श्री शरद कांतीला निकम किल्ले मच्छिंद्र वाळवा तालुका यांना आदर्श कार्यकर्ता सामाजिक पुरस्कार देण्यात आला त्यावेळी मा.नामदेव चव्हाण साहेब सरन्यायाधीश जिल्हा यांच्यातर्फे देण्यात आला शरद निकम हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आपल्या भागातील गरजू गोरगरिबांना नेहमी मदत करतात तसेच ते विविध संस्थेत सुद्धा कार्यरत आहेत निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा सांगली जिल्हा उपाध्यक्ष,झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य वाळवा तालुका सचिव, टायगर ग्रुप वाळवा तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
या पुरस्कर पुरस्कार वितरण कार्यक्रमात राजमाता जिजाऊ झुंजार महिला पुरस्कार नीलिमा कदम ,डॉ. अर्चना जोशी, श्रेया फाटक तसेच आदर्श कार्यकर्ता पुरस्कार डॉ. राजू पांचाळ सर , विठ्ठल माने सर असे विविध पुरस्कार कार्यकारी अध्यक्ष दुष्यंतराजे जगताप व त्यांचे सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक व पुरस्कार्थी यांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला.
ऐश्वर्या थोरात नगराध्यक्ष हे उपस्थित होते शरद निकम यांना यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना चेअरमन डॉ. सुरेश बाबा भोसले व एन डी पाटील शुगर कारखाना अध्यक्ष केदार पाटील यांनी शुभेच्छा दिल्या नारी फाउंडेशनच्या अध्यक्षा अस्मिता जाधव संतोष सर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि सत्कार समारंभ पार पडला




