मलठण येथे अवैध दारूसाठ्यावर शिरूर पोलिसांची कारवाई; ६३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

शिरूर : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करत ६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मलठण गावातील ओंकार हॉटेलसमोर करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.४० वाजण्याच्या सुमारास मलठण गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. आरोपी नितीन एकनाथ चोरे (वय ४३, रा. डोंगरगण, ता. शिरूर, जि. पुणे) हा कोणताही परवाना नसताना देशी व विदेशी दारू विक्रीसाठी जवळ बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्याअनुषंगाने शिरूर पोलिसांनी छापा टाकून आरोपीच्या ताब्यातून क्लासिक गोल्ड व्हिस्कीच्या १८० एमएलच्या १० बाटल्या, डरबी स्पेशल व्हिस्कीच्या १५ बाटल्या तसेच टेंगो पंच देशी दारूच्या ३० बाटल्या असा एकूण ६३०० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.
या प्रकरणी पोलीस अंमलदार जी. एस. गोसावी यांनी फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पालवे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *