शिरूर बेट मंडलात भाजपची संघटनात्मक मजबुती – विलास बत्ते सरचिटणीसपदी नियुक्त

रांजणगाव गणपती (वार्ताहर) :
भारतीय जनता पार्टी, पुणे जिल्हा उत्तर अंतर्गत शिरूर बेट मंडल कार्यकारिणीत सरचिटणीस (महामंत्री) पदावर श्री. विलास रावसाहेब बत्ते यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष संघटन अधिक मजबूत होण्याच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.
या निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत बत्ते यांचे स्वागत केले. निवड प्रक्रियेदरम्यान भाजप पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद, जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सातव, शिरूर बेट मंडल अध्यक्ष संयोगिता ताई पलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर दादा पाचुंदकर, शिरूर-आंबेगाव माजी तालुकाध्यक्ष सतीश पाचंगे, उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नानासाहेब लांडे, विद्यार्थी आघाडीचे माजी अध्यक्ष हर्षद जाधव, उद्योजक सचिन कुटे, बजरंग दल अध्यक्ष सोमनाथ बांदल, विकास फंड, शैलेश पाचुंदकर, अजित इटनर तसेच केशव लांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विलास बत्ते हे धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विविध समाजोपयोगी उपक्रमांमधून त्यांनी जनसंपर्क वाढवत समाजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या संघटन कौशल्याचा लाभ पक्षाला होईल आणि स्थानिक पातळीवर भाजपची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
निवडीनंतर बोलताना बत्ते यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त करत, “पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यास प्राधान्य देणार आहे,” असे सांगितले. त्यांनी विकासाभिमुख राजकारणावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून रांजणगाव गणपती परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्याकडून प्रभावी नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *