“तळागाळातील पत्रकारांचा बुलंद आवाज! अनिकेत उमरेडकर यांची विदर्भ प्रमुखपदी नियुक्ती”

  • नागपूर :अनिकेत उमरेडकर 

तळागाळातील पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे अनिकेत उमरेडकर यांची महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनाच्या विदर्भ प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकमानशाह उस्मानशाह यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र लढा पत्रकार संघटना ही असंघटित घटक, कामगार आणि दुर्बल समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी प्रभावी संघटना म्हणून ओळखली जाते. गोरगरीब आणि दीनदुबळ्या घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघटना सातत्याने लढा देत असून, अनेकांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
अनिकेत उमरेडकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न शासन दरबारी पोहोचवण्याचे कार्य सातत्याने केले आहे. आपल्या लेखणीच्या बळावर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अनेक वेळा पुढाकार घेतला आहे. अन्याय, अत्याचार आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका घेत सक्रिय कामगिरी बजावली आहे.
त्यांच्या या प्रभावी कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर विदर्भ प्रमुखपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विदर्भातील पत्रकारांच्या हक्कांसाठीच्या लढ्याला अधिक बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी अनिकेत उमरेडकर म्हणाले,
“संघटनेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत, अनेक वर्षे काम करूनही न्यायापासून वंचित राहिलेल्या पत्रकारांच्या हक्कांसाठी अधिक जोमाने लढा देणार आहे. तसेच तळागाळातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावी प्रयत्न सुरू ठेवणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *