शिरूर मधून आई–मुलगा बेपत्ता

शिरूर (ता. शिरूर) येथील भाजीबाजार परिसरातील राहत्या घरातून आई–मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या बाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौ. फरजाना मोसीन बागवान (वय ३८ वर्षे) व त्यांचा मुलगा उबेद मोसीन बागवान (वय १२ वर्षे) हे दोघे १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता राहत्या घरातून बाहेर पडले. फरजाना यांनी माहेरी बोधेगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर येथे जात असल्याचे सांगून मुलगा उबेद याला सोबत घेतले. मात्र त्या दोघीही अद्याप माहेरी पोहोचल्या नाहीत तसेच घरी परतल्याही नाहीत.

बेपत्ता झालेल्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे :
- फरजाना बागवान : उंची ५ फूट, सावळा रंग, लांब काळे केस, कानात काळ्या रंगाचे कर्णफुले, दोन्ही हातात काचेच्या बांगड्या, अंगाने मजबूत, शिक्षण ७ वी.
- उबेद बागवान : वय १२ वर्षे, उंची साडेचार फूट, सावळा रंग, अंगाने मजबूत, डोक्यावर काळे बारीक केस, अंगात हिरवा–पिवळा–निळा चौकडी शर्ट व निळी नाईट पॅन्ट.

याबाबत श्री. मोसीन गनी बागवान (रा. भाजीबाजार, शिरूर) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली असून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस अंमलदारांकडून सुरू आहे.




