खेड तालुक्यातील गुणवंतांचा सन्मान

खेड तालुक्यातील गुणवंतांचा सन्मान

तनिष्का भालेराव हिचा ९४% गुणांसाठी सत्कार

खेड (पुणे) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना, महिला आघाडी शाखा – खेड, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सन्मान गुणवंतांचा या कार्यक्रमात दहावीतील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विलास बडे, संपादक (न्यू १८ लोकमत) होते. त्यांच्या हस्ते तनिष्का यशपाल भालेराव हिचा इयत्ता दहावीत ९४% गुण मिळवल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे साहेब उपस्थित होते. तसेच तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.

या उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून अधिकाधिक विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

✍️ आर. जे. न्यूज 27 मराठी साठी दौंड तालुका प्रतिनिधी – विकास साळुंके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *