आमचे सहकारी व तरुण उत्साही पत्रकार श्री. आल्लुद्दिन अल्वी यांची भारतीय जनता पार्टी शिरूर तालुका आयटी सेल प्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

शिरूर तालुका

– आमचे सहकारी व तरुण उत्साही पत्रकार श्री. आल्लुद्दिन अल्वी यांची भारतीय जनता पार्टी शिरूर तालुका आयटी सेल प्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिरूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रात याचे स्वागत केले जात आहे.

श्री. अल्वी हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, वंचित घटकांच्या समस्या पुढे आणणे, तसेच विकासकामांना योग्य प्रसिद्धी मिळवून देणे या माध्यमातून त्यांनी आपली स्वतंत्र छाप पाडली आहे. त्यांचा पत्रकारितेतील प्रामाणिक व वस्तुनिष्ठ दृष्टीकोन यामुळेच त्यांना विविध क्षेत्रांतून मान्यता मिळाली आहे.

आजच्या डिजिटल युगात पक्ष संघटनाच्या दृष्टीने आयटी सेलचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. पक्षाच्या विचारसरणी, योजनांचे प्रभावी प्रसार व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आयटी सेल हीच एक प्रमुख माध्यमे ठरत आहेत. अशा महत्वाच्या जबाबदारीसाठी आल्लुद्दिन अल्वी यांची निवड झाली आहे, ही निश्चितच पक्षाच्या विश्वासाची पावती आहे.

भाजपचे तालुक्यातील नेते, कार्यकर्ते व समर्थकांनी श्री. अल्वी यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासाठी व सामाजिक एकात्मतेच्या दिशेने ते आपले योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

श्री. अल्वी यांना मिळालेली ही जबाबदारी त्यांच्या पत्रकारितेतील प्रामाणिकतेची, कर्तृत्वाची व सामाजिक बांधिलकीची दखल घेतल्याचे प्रतीक आहे. त्यांच्या पुढील राजकीय प्रवासासाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *