आरजे न्यूज २७ मराठीसाठी दौंड तालुका प्रतिनिधी – विकास साळुंके
रक्तदानातून जिवंत ठेवला सहकाराचा संदेश — सहकार महर्षी काकासाहेब थोरात पुण्यस्मरण सोहळा

दौंड-बोरी पारधी
“रक्तदान हेच जीवनदान” या भावनेतून सहकार महर्षी स्वर्गीय काकासाहेब थोरात यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बोरी पारधी
येथील श्री क्षेत्र बोरमलनाथ मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
काकासाहेबांच्या सहकार चळवळीच्या आदर्शातून प्रेरणा घेत शेकडो युवक-युवतींनी या शिबिरात उत्साहाने रक्तदान केले. रक्तदान करताना अनेक दात्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू दाटले — “ज्यांनी आपल्याला सहकाराचा मार्ग दाखवला, त्यांच्यासाठी काहीतरी देण्याची हीच खरी वेळ” असे अनेकांचे म्हणणे होते.
या भावनिक प्रसंगी भक्तीगीतांचा सुरेल कार्यक्रम रंगला. “ताल, श्रुती आणि भाव भक्ती रंग” या शीर्षकाखाली सादर झालेल्या गीतांनी उपस्थितांची अंतःकरणे भारावून गेली.
या पुण्यस्मरण प्रसंगी आमदार राहुल कुल, आनंद थोरात यांच्यासह तालुक्यातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी समाधीस्थळी पुष्प अर्पण करून सहकार महर्षींना अभिवादन केले.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सहकार महर्षी मा. काकासाहेब थोरात ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, बोरी पारधी (ता. दौंड, जि. पुणे) यांनी उत्कृष्टरीत्या केले.
कार्यक्रमानंतर ग्रामस्थांनी “काकासाहेब थोरात यांचे सहकार तत्त्व आजही समाजाच्या रंध्रात रुजलेले आहे” अशी भावना व्यक्त केली.
आरजे न्यूज २७ मराठीसाठी दौंड तालुका प्रतिनिधी – विकास साळुंके











