February 9, 2026 4:25 pm

सत्ताधाऱ्यांना ठेकेदाराकडून ‘डिफेंडर’ कार भेट! – काँग्रेसचा स्फोटक आरोप
हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा — “२१ आमदारांना ठेकेदाराने दिवाळी गिफ्ट दिली”
राज्यात राजकीय भूकंपाची चाहूल; ‘तो ठेकेदार कोण?’ यावर चर्चेचा भडका

प्रतिनिधी- Rjnews27marathi
महाराष्ट्राच्या राजकारणात दिवाळीच्या प्रकाशासोबत आता ‘डिफेंडर’ कारचा मुद्दा धगधगतो आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी २१ आमदारांना एका ठेकेदाराने डिफेंडर कार भेट दिल्या असल्याचा गंभीर आणि स्फोटक आरोप केला आहे. त्यांच्या या विधानाने राज्यात प्रचंड खळबळ उडाली असून, सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळात चर्चेचा भडका उडाला आहे.
एका ठेकेदाराने २१ आमदारांना डिफेंडर कार भेट दिल्या आहेत, यामागचं राजकारण लवकरच समोर येईल.”
— हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
सपकाळ बुलढाणा येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “या दिवाळीत ठेकेदारांची मोठी मेहरबानी सत्ताधाऱ्यांवर झाली आहे. एक कार इथे आली, पण कदाचित २२ कार असतीलही.” त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा पेटली आहे.
राज्यभरात आता एकच प्रश्न उपस्थित झाला आहे —
➡️ हे २१ आमदार कोण आहेत?
➡️ तो ठेकेदार कोण आहे?
➡️ आणि या गिफ्टमागे कोणते फायदे लपले आहेत?

या सर्व प्रश्नांची उत्तरे सपकाळ यांनी अद्याप जाहीर केलेली नसली तरी त्यांनी ती “योग्य वेळी राज्यासमोर आणणार” असे सांगितल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
काँग्रेसचा नवा मोर्चा : मतचोरीवर चित्रपट प्रदर्शन

दरम्यान, काँग्रेसने सत्ताधाऱ्यांविरोधात ‘मतचोरी’ या मुद्द्यावरून हल्ला चढवण्याची मोहीम सुरू केली आहे. उद्या संध्याकाळी मुंबई प्रेस क्लबमध्ये ‘मतचोरी’ या विषयावर आधारित विशेष चित्रपट दाखवण्यात येणार असून, या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार आहेत.

या चित्रपटानंतर चर्चा सत्र आयोजित करण्यात येणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस हा विषय हाताळून आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे.
१ नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा मोर्चा
महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांनी १ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी मोर्चाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांवर हल्ला तीव्र करण्यात आला आहे. सपकाळ यांच्या “डिफेंडर गिफ्ट” आरोपानंतर विरोधकांचा उत्साह वाढलेला दिसतोय
एकला चलो रे” सूर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्र मोर्चा उघडण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसला “संघर्षात एकटं नको पडू” असा इशारा दिला आहे.
राज्यात सध्या ‘डिफेंडर’ कारपेक्षा जास्त गतीने फिरत आहे राजकीय चर्चेची इंजिनं.
हर्षवर्धन सपकाळ यांचा हा बॉम्ब किती मोठा स्फोट घडवतो,
हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें