February 9, 2026 4:49 pm

वाघाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. अनिता विजय गावडे यांची बिनविरोध निवड…

वाघाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. अनिता विजय गावडे यांची बिनविरोध निवड
— नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

शिरूर (प्रतिनिधी)- Rjnews27marathi

शिरूर तालुक्यातील वाघाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. अनिता विजय गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे वाघाळे व पंचक्रोशीतील नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

 दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्या रिक्त पदासाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. वाघाळे ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य कार्यरत असून सरपंचपद हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होते. यानिमित्त सर्व सदस्यांनी ग्रामपंचायतीतील प्रत्येक महिलेला सरपंचपदाची समान संधी देण्याचा निर्णय घेतला.

या पार्श्वभूमीवर सर्व सदस्यांच्या एकमताने सौ. अनिता विजय गावडे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीच्या वेळी वाघाळे येथील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, विद्यमान सदस्य, सोसायटीचे सर्व संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

महिलांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीचा कारभार सक्षमपणे चालावा ही शासनाची संकल्पना मान्य ठेवून सर्व सदस्यांनी एकमुखाने निर्णय घेतल्याचे माजी सरपंच व ज्येष्ठ सदस्यांनी सांगितले.

या निवड प्रक्रियेसाठी मंडळाधिकारी स्वाती टावरे, तलाठी मनोहर तेलंग, व ग्रामसेवक शितल भालसिंग यांनी उपस्थित राहून आवश्यक कार्यवाही पूर्ण केली.

वाघाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. अनिता विजय गावडे यांची बिनविरोध निवड नवनिर्वाचित सरपंच सौ. अनिता विजय गावडे यांचा ज्योतीताई पाचुंदकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिरूर खरेदी विक्री संघाच्या संचालिका सुजाता नरवडे, संचालक लहू थोरात, खंडाळे सरपंच सारिका दरवडे, मा. सरपंच ज्योती नरवडे, रांजणगाव ग्रामपंचायत सदस्य मनीषा पाचुंदकर उपस्थित होत्या.

सौ. अनिता गावडे यांच्या निवडीमुळे वाघाळे ग्रामपंचायतीत महिला नेतृत्वाला नवा उत्साह व प्रेरणा मिळाली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Advertisements

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें